लांजा:– (गोविंद चव्हाण) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग नं६६या मार्गावर उड्डाणपूलचे काम गेली तिनचार वर्षं चालू आहे.लांजा एसटी डेपो ते उपशेटेवाडी सुमारे दोन किलोमीटर लांबीचा पूल असून उपशेटे वाडी येथील उभारण्यात आलेल्या पुराच्या भरावयाच्या भिंतीच्या कॉक्रीट प्लेट्स सैल ढिल्या झाल्याने त्या पडण्याच्या मार्गावर असलेल्या जनतेत जोरदार चर्चा सुरू झाली व ठेकेदारांना जाग आली.
ठेकेदार यांनी उड्डाणपूलाच्या भरावाच्या काॅक्रिट प्लेटस साॅईल नेलींग केली जात आहे.३०फुटाच्या भरावातून लोखंडी शिगा घुसवून सिमेंट भरून रिपरिंग करत आहेत भविष्यात पुढे कोसळणार तर नाहीनां असा प्रश्न पडतोच.
अब्जावधी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या पुलाचे कमकुवत नित्कृष्ट झाले आहे असे जनतेतून बोलताना दिसून येते.