खोपोली : खोपोली नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावात नगरपालिकेकडून होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ आणि महिला नाराज होत्या. या प्रश्नाच्या निषेधार्थ पुढील आठवड्यात ग्रामस्थांनी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली होती. याची दखल घेत उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती विक्रम साबळे यांनी तातडीने पाणीपुरवठा अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासमवेत बैठक घेऊन गावातील पाणीप्रश्नावर यशस्वी तोडगा काढला.

यावेळी साबळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही उपयुक्त सूचना देत त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेशही दिले. उपनगराध्यक्ष साबळे यांनी या प्रश्नात त्वरित लक्ष घातल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. मात्र, भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली.

उपनगराध्यक्ष साबळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला पाणीपुरवठा अधिकारी भोईर, अभियंता कराळे, कर्मचारी चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.