मुंबई : अशोक खरात प्रकरणात आता ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री झाली आहे. गंभीर गुन्हेगारांना धडकी भरवणारे, कठोर खटले चालवणारे आणि न्यायालयीन रणांगणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारे निकम आता या प्रकरणात उतरले आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, न्यायालयीन लढाईला नवा वेग मिळणार आहे.
उज्वल निकम म्हणजे गुन्हेगारांसाठी “कायद्याचा वज्रपात”, आणि सरकारसाठी “न्यायालयीन शस्त्र”. त्यामुळे या प्रकरणाचा पुढचा अध्याय अधिक तुफानी होणार, यात शंका नाही.