शिरगाव..चिपळूण तालुक्यातील शिरगाव खालचीवाडी येथे शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी आई महाकाली देवीचा छबिना साजरा होत असून विद्युत् रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे.
शिरगाव कुंभार्ली पोफळी तीन गावचे जागृत देवस्थान आई महाकाली देवीचा छबिना महिनाभर सुरू असतो त्यात शिरगाव येथील आई महाकाली देवीचा छबिना महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे शिरगाव येथे उद्या आई महाकाली देवीचा छबीना शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी आई महाकाली देवीचा छबिन्यास रात्री 11 वाजता सुरू होईल यावेळी पंचक्रोशीतील ढोल ताशे , अंबारी,आकर्षक विद्युत रोषणाई व गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी छबिण्यात करण्यात येईल.
तरी आई महाकाली देवीच्या छबिण्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरगाव खालचीवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
शिरगाव येथे उद्या आई महाकाली देवीचा छबीना
