मुंबई : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. १२६ जणांच्या या कार्यकारिणीत खजिनदारपदी अनिकेत नवले व अक्षय जैन, संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार आणि प्रशासन सरचिटणीसपदी विवेक गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय तनवीर विद्रोही, प्रशांत ओगले, प्रथमेश अबनावे, कपिल ढोके, अनुराग भोयर, आमेर अब्दुल सलीम, दिप्तेश परब, आफरीन हुसेन यांची उपाध्यक्ष पदी तसेच ४४ सरचिटणीस आणि ७४ प्रदेश सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या कार्यकारिणीत सर्वसामान्य कुटुंबातील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत तळागाळात काम करणाऱ्या आणि संघटनेसाठी सातत्याने झटणाऱ्या युवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे युवकांमध्ये काँग्रेस पक्षाबद्दल आणि युवक काँग्रेसबद्दल आशादायी वातावरण निर्माण झाले असून, राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवतील व युवकांच्या प्रश्नांवर जोरदार आंदोलने करतील असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे.
अनिकेत नवले ,अक्षय जैन ,प्रवीण कुमार बिरादार ,विवेक गावंडे ,तनवीर विद्रोही ,प्रशांत ओगले ,प्रथमेश आबनावे ,कपिल ढोके, अनुराग भोयर ,अमीर अब्दुल सलीम दीप्तेश परब ,आफरीन हुसेन, अभिजीत चव्हाण ,अमोल देशमुख ,आनंदकुमार दुबे ,अभिलाष तायडे, अजय डीडोरे, अनुष्का वानखेडे ,अक्षय हेटे ,अभिषेक धवड अमित जाधव, आकाश गुजर, उत्कर्ष देशमुख ,केतन रेवतकर ,गणेश उबाळे ,गौरव जेस्वाल ,जावेद पटेल ,दिग्वीजय पाटील ,दिलीप सिंग देशमुख, दीपक पाठक ,नितेश वानखेडे ,रमीझ शेख, निलेश गुहे ,परीक्षित जगताप ,प्रशांत गायकवाड ,प्राची ताकतोडे ,भगवान पडांगळे, भूषण रानभरे ,भूषण मारसकोले ,महेश म्हेत्रे ,मेघा सावसागडे ,मेघशाम धर्मावत ,मोहसीन शेख, यशराज मुळक ,राहुल उगले ,रितेश पांडव ,रोनक चौधरी ,विश्वदीप पडोळ ,वीरधवल गाडे ,सागर कलानी ,सावन कुमार दरुरे, सागर चव्हाण ,सुशांत लोखंडे ,हितेश थोरात ,हिशामुद्दिन खान ,श्रेया ठाकरे ,अभिषेक अवचल ,अथर्व सोनार ,अजिंक्य बाबर ,अमर कुळे ,अनिकेत सोनवणे ,अफजल बेरा ,अंकुश मुंजेवार ,आनंद दासा ,अभिलाष पावडे ,आयुषी देशमुख ,आकाश भोपळे ,आदिनाथ केदार ,ओमकार मोरे ,उमेश खंदारे ,इरफान पठाण, कृष्णा तवले ,कौस्तुभ शिर्के, किरण पाटील,गुरमीत गिल ,जयंत कुमार सोनवणे ,जमील अहमद कणसे ,दिनेश सरताळे, धवलसिंग लावंड,धीरज सोनवणे ,नेहल देशमुख ,निखिल वानखेडे, निलेश अंबादे ,नीरज धुमाळ, निखिल सुतार ,निलेश गायकवाड ,निखिल मलके, प्रतीक पाटील, प्रणाली पाटील, प्रशांत जाधव ,प्रशांत पारवे ,प्रियंका चौधरी, प्रदीप मेहकर,पंकज पोळ, फैसल खान ,बंटी नागरे, बिलाल मुल्ला,मुजाहेद पटेल, मुजाहिद खान,मेहूल आडवाणी, मोहित जाधव, धीरज धकाते, ऋतुजा वाघमोडे, राधिका देशमुख, रेणुका खवले, रोमा चौधरी,राहुल हुलगे, रुपेश शेंद्रे,वसीम कुरेशी,वसीम जमीनदार,विवेक घोंगडे, विकास सुपनर,विश्वजीत जाधव,हेमंत कतूरे, सुमंत कुरेकर,शोहेब पटेल शोईब शेख, सत्यजित बिरादार, सय्यद शहेजाद,सय्यद यासुब इमाम, सुरज पंडित,सुरभी ढोका, सौरभ रूपनर,सौरभ म्हशाखेत्री, स्नेहल बांगर, स्नेहा जोग,श्रद्धा कांगे, मंदार वाडेकर, श्रीकांत ढोणे.