पनवेल : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी खणा-नारळाने ओटी भरून देवीची पूजा केली.

चैत्र नवमीच्या पूर्वसंध्येला घेतलेले दर्शन विलोभनीय असल्याचे महेंद्रशेठ घरत म्हणाले. समाजातील दिनदुबळ्यांना मदत करण्याची मनोकामना पूर्ण करण्याचे बळ लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी महालक्ष्मीकडे केली. कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई) हे महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक मुख्य शक्तिपीठ आहे. हे मंदिर प्राचीन करवीर निवासिनीचे आहे. स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण म्हणून महालक्ष्मीच्या मंदिराची ख्याती आहे. महालक्ष्मीचे मंदिर हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे महेंद्रशेठ घरत दरवर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतात आणि देवीची मनोभावे पूजा करतात.