मंडणगड : मंडणगड बाजारपेठ परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज सिद्धार्थ पवार (वय ३०, रा. पंदेरी बौद्धवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा मंडणगड बाजारपेठेतील छकुली देशी बारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी आम्रपाली अशोक आवळे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सूरज सिद्धार्थ पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे.