मंडणगड : मंडणगड शहरातील बोरीचा माळ येथील कोंडेकर चाळ येथे राहणारे दिनेश मोहन मेहता (वय ५०) यांचा अकस्मिक मृत्यू झाल्याची घटना१६ नोव्हेंबर २०२६ रोजी उघडकीस आली. या घटनेची मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश मोहन मेहता हे मूळचे गोपाळपाडा, होमगार्ड ऑफिस, वेश्वी, अलिबाग येथील रहिवासी असून सध्या बोरीचा माळ, मंडणगड येथे वास्तव्यास होते. ते मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांना दारूचे व्यसनही होते
रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ पासून सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजेपर्यंत ते घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे खबर देणारे मिलन मुरलीधर मेहता व गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेतला असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दिनेश मोहन मेहता यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २१/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेची नोंद एन.सी.आर.बी.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.