मुंबई : मुंबई महानगरपालिका आणि नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांच्या स्मारकाचा समारंभ २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दोस्ती एकर वडाळा पूर्व येथे संपन्न झाला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुरेंद्र शंकरशेट यांच्या शुभहस्ते पायाभरणीची कुदळ मारुन करण्यात आली. प्रमुख पाहुणे दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे अध्यक्ष डॉ गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष श्री दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस ॲड मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर,परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.आनंद पेडणेकर. सूर्यकांत कल्याणकर आणि प्रतिष्ठानचे, परिषदेचे कार्यकारणी सदस्य आणि वास्तुविशारद श्री शशांक मेहंदळे, ठेकेदाराचे भागीदार कांतीशेट यांच्यासह नाना प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आर्थिक मदतीसाठी QR code आणि आवाहन पत्रकाचे उद्घाटन करण्यात झाले.
संस्कार भारतीचे प्रतिनिधी श्री हरेश आमडेकर यानी संस्कृत भाषेतून शुभेच्छा दिल्या आणि संस्कृत भाषेचा संवर्धन आणि प्रचार. प्रसार झाला पाहिजे यासाठी आवाहन केले.