चिपळूण : निवळी येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठोबा-रखुमाई मंदिरात भक्तिमय वातावरणात भजन व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात दिंडीत सहभाग घेत “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषात विठूनामाचा गजर केला. टाळ-मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

त्यानंतर मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित भाविकांनी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होत एकादशीचे महत्त्व अनुभवले. या कार्यक्रमामुळे गावात भक्ती, एकोपा व सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हा संपूर्ण कार्यक्रम कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, आणि ग्रामीण कृषि कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती व ग्रामस्थांनी तसेच कृषिदूत मयुरी गावडे वैष्णवी कोकरे सानिका भोसले शितल डोहळे यांनी विशेष परिश्रम घेतले.