मुंबई : पंचरत्न मित्र मंडळ व आर.सी. एफ्. कंपनी लि.यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर विभागातील घाटले गांव येथे स्थानिक नागरीकांकरीता आरोग्य शिबिर नियोजित कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.सदर शिबिराचा १५० नागरीकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात रक्तदान, शुगर तपासणी, पी. एफ्.टी. टेस्ट, नेत्रचिकित्सा, बी.एम.डी. टेस्ट, तसेच बोन डेन्सिटी तसेच अॅरिक्युलर थेरपी इत्यादी तपासणींचा समावेश होता. तपासणीनंतर गरजूंना मोफत चष्मा व औषधे यांचे वाटप करण्यात आले.
आर.सी.एफ. कंपनीचे मा. संचालक (विपणन) श्री. निरंजन सोनक साहेब, तसेच मा. महाप्रबंधक (आय.टी.सी.सी., सी.एस.आर) श्री. संजय पेटकर साहेब हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. श्री. संतोष शिकतोडे (उपअभियंता, नवी मुंबई महानगरपालिका) प्रसिध्द क्रिक्रेट कोच मा. सचिन कोळी व स्थानिक नगरसेविका सौ. मिनाक्षी पाटणकर मॅडम आणि ‘आपला घाटला गाव आपला विकास’ या मंडळाचे सर्वेसर्वा मा. श्री. हेमंत अनंत पाटील साहेब हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात नानावटी हॉस्पीटलची टीम तसेच तज्ञ डॉ. रजनीश कुमार, मा. श्रुतिका कांबळे, डॉ. निलय सराफ, नेत्रतज्ञ, अॅरिक्युचर थेरपी तज्ञ डॉ. किशोर चव्हाण व इतर तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीला मान्यवरांचे शाल, श्रीफळ व तुळशीचे रोप देऊन स्वागत केले तसेच आपला अमुल्य वेळ देऊन कार्यक्रमाला आलेले सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांचे देखील तुळशीचे रोप, शाल व भेटवस्तू देऊन मंडळाने त्यांना सन्मानीत केले. १०० ते २०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ वहया, फ्रुटी व बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले.
पंचरत्न मित्र मंडळ सातत्याने एक ना अनेक असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. जेष्ठ नागरीक व गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊऊ त्यांच्याकरीता असे आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे, खेळाचे साहित्य देऊन प्रोत्साहित करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन, पूरग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप, आदिवासी महिलांना साडी वाटप, वृक्षारोपण करणे, असे अनेक कार्यक्रम ही संस्था निःस्वार्थीपणे करतांना आम्ही पाहिले आहे. खरोखरच अनेक सेवाभावी संस्था असतात. परंतु हया संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच. असे उद्गार प्रमुख पाहुणे श्री. निरंजन सोनक साहेब यांनी काढले. तर मा.श्री. पेटकर साहेब म्हणाले की, अशा लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे. मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे त्यांनी कौतुक केले.स्थानिक नगरसेविका सौ. मिनाक्षी पाटणकर मॅडमनी सुध्दा मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. श्री. हेमंत पाटील साहेब यांनी सुध्दा खूप छानरित्या आयोजन करुन व्यवस्थापन व स्नेहभोजन केले.
मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर व सचिव श्री.प्रदीप गांवड, उपाध्यक्ष श्री.रमेश पाटील, खजिनदार श्री.सचिन साळुंखे, श्री.वैभव घरत, श्री. हनुमंता चव्हाण, श्री.डी.एम. मिश्रा, श्री.सचिव पुरुपाटसावगीकर, सूर्यकांत वासुदेव, सौ.स्नेहा नानीवडेकर मॅडम, सौ.नीलम गावंड, सौ.नीता पाटील, सौ.अंजली मौर्या, सौ.स्वाती पाटील,सचिन राखाडे, संदीप पाटील,मंदार भोपी,दिनेश चौधरी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे सदर शिबिर यशस्वीरित्या पार पडले संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रिकरण श्री.मॅथ्यू डिसोझा यांनी केले तर सौ. स्नेहा नानीवडेकर यांनी सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाला रंगत आणली. श्री.हेमंत पाटील व त्यांचे सहकारी यांनी देखील कार्यक्रमात सहभागी होऊन हातभार लावला.
पंचरत्न मित्र मंडळ व आर.सी. एफ्. कंपनी लि.यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथील घाटले गांवमध्ये आरोग्य शिबिर संपन्न…
