पेण (प्रशांत पोतदार) : पेण परिषदेच्या स्थायी समिती सदस्य सभापतींची निवड पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील,यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यामध्ये नगराध्यक्ष प्रीतम पाटील सभापती, स्मिता माळी या सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती, उपसभापती निवृत्ती पाटील आरोग्य व विद्युत समिती, आनंद जाधव पाणीपुरवठा व जलनिसारण समिती, सुनीता जोशी कर व शुल्क समिती तर कलावती पाटील महिला व बाल कल्याण समिती,आफ्रिन मुद्दसिर
अखवारे क्रीडा व शिक्षण समिती,अनिरुद्ध रविंद्र पाटील नामनिर्देशित सदय (गट नेते), या भाजप राष्ट्रवादी महायुतीतील नगर सेवकांचा स्थायी समिती रचना व सदस्यांची नावे पिठासीन अधिकारी प्रीतम पाटील यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी उपस्थित मान्यवर नगरसेवक निळकंठ म्हात्रे,नगरसेवक अजय क्षीरसागर,नगरसेवक मितेश शहा,नगरसेवक प्रवीण पाटील,नगरसेवक दिपक गुरव,नगरसेविका अंजली जोगळेकर,नगरसेविका पल्लवी कालेकर, मुद्दसिर आखवारे,शोमेर पेणकर, आदी तसेच अधिकारी,नागरिक यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.