चिपळूण : पेठमाप गावचे सुपुत्र श्री. पंकज राकेश तांबडे यांची दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ब्लाइंड क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पंकज तांबडे यांनी जिद्द, मेहनत आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूण तालुक्यासह पेठमाप गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कर्णधार म्हणून पंकज तांबडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांसह क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पेठमापचा सुपुत्र पंकज तांबडे यांची महाराष्ट्र ब्लाइंड क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड…
