लोटे :- पिरलोटे ते घरडा कॉलनी आणि सोनगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येची तत्परतेने दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, ८ सप्टेंबर रोजी एमआयडीसी खेर्डी येथील कार्यालयात जाऊन उप अभियंता मा. श्री. हळदणकर साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले. हे निवेदन धामणदेवी पंचायत समिती सदस्या सौ. रेवती राजेंद्र घाग यांच्या पुढाकाराने सुपूर्द करण्यात आले.
आगामी गणेशोत्सवाचा सण तोंडावर असल्याने नागरिकांची व भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्यात यावेत आणि पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत उप अभियंता श्री. हळदणकर यांनी येत्या दोन दिवसांत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे ठोस आश्वासन दिले.
यावेळी धामणदेवी पंचायत समिती सदस्या सौ. रेवती घाग, विभाग प्रमुख श्री. राजेंद्र घाग, उपतालुकाप्रमुख श्री. विजय साळुंखे, सोनगाव उपसरपंच श्री. मिलिंद घोरपडे, शाखाप्रमुख श्री. दीपक घाग, श्री. प्रथमेश घाग, श्री. दत्ताराम घाग व श्री. अमोल चाळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
पिरलोटे-सोनगाव रस्त्यावरील खड्डे दोन दिवसांत बुजवणार; शिवसेना (उबाठा) च्या निवेदनानंतर एमआयडीसी प्रशासनाचे आश्वासन
