चिपळूण : ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत चिपळूण येथे आले असता, शौकतभाई मुकादम यांनी त्यांची भेट घेऊन कळंबस्ते येथील वाशिष्ठी नदीवर गणपती विसर्जन घाट बांधण्याची मागणी केली.

यावर्षी गणपती विसर्जन घाटाचे काम होऊ शकले नाही. मात्र, पुढील वर्षी तरी हा घाट नक्की बांधून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी शौकतभाई मुकादम यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी, “पुढील वर्षी नक्की गणपती विसर्जन घाट बांधून देऊ,” असे आश्वासन दिले.

दरम्यान, गणपती विसर्जन घाटासंदर्भात आमदार शेखर निकम हेदेखील पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

या भेटीवेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, नियोजन मंडळाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, जयंत शेठ खाताते, विठ्ठल कुलकर्णी, नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.