रत्नागिरी : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत रायगड, रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण ६ उमेदवारांची १२ नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी ३० मे रोजी १ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ४, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, मानसी संतोष म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ आणि अनिकेत सुनील तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी ४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. अशा प्रकारे आज ५ उमेदवारांची ११ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असून, एकूण ६ उमेदवारांची १२ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. उद्या, मंगळवारी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.