मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रचंड रस्सीखेच आणि दावे-प्रतिदावे झाल्यानंतर महायुतीतून १७ जगांसाठी उमेदवारांची नाव निश्चित झाली आहेत. भाजपा ११, शिवसेना (एकनाथ शिंदे) ४, राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
