पेण (प्रशांत पोतदार) : रस्ता सुरक्षा अभियान-२०२६च्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण, जिते येथे करण्यात आले आहे.

या अभियानाचा उद्देश रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करणे हा असल्याने. या कार्यक्रमात रिक्षा, टॅक्सी, विद्यार्थी वाहतूक चालक आणि बस वाहतूक चालकांसाठी मार्गदर्शन, अपघातप्रसंगी मदत करणाऱ्या जीवनदूतांचा/संस्थांचा, विना अपघात एसटी चालक, उल्लेखनीय कार्य करणारे रिक्षा चालक, कोलाड येथील रेस्क्यू टीम, उल्लेखनीय कार्य करणारे ट्रॅफिक हवालदार, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रिल स्पर्धा इ. मधील विजेते विद्यार्थी तसेच श्री चैतन्य पाटील, सुजाण नागरिक, कासू या सर्वांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पेण सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे यांच्या कडून करण्यात आले आहे.