चिपळूण : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे येत्या १ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील तालीम हॉलमध्ये होणार आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सामाजिक संस्था, विद्यार्थी, तरुण वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष शैलेश टाकळे यांनी केले आहे.

रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१७० मध्ये दीडशेहून अधिक क्लब समाविष्ट आहेत. या सर्व क्लबतर्फे १ जुलै रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेनी डिकोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट ३१७०तर्फे दहा हजार युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे १०० युनिट रक्त संकलित करण्याचा मानस आहे.

या शिबिरामध्ये रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी रोहन देवकर 9820141814 , प्रशांत देवळेकर 9890863449 , शैलेश टाकळे 9822129303, अंकुश गांधी 9860194987 ,दिनकर पवार 8888113803 , मंगेश गोंधळेकर 9270539590 , मनोज जैन 9822681669
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.