दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सचिनजी गायकवाड यांची रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल दापोली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
सचिन गायकवाड यांनी यापूर्वीही रत्नागिरी जिल्ह्यात मनसेच्या संघटनात्मक वाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक सक्षम करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, युवकांना संघटनेत सक्रिय करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठविणे, या दृष्टीने आगामी काळात काम करण्याचे आव्हान नव्या जबाबदारीत त्यांच्यासमोर असणार आहे.
सचिन गायकवाड यांची रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती;…
