चिपळूण : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमेश्वर येथील कसबा गावातील सरदेसाई वाड्याची महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री सन्मा अँड श्री आशिष जी शेलार यांनी पाहणी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेल्या या वारसास्थळाचे संवर्धन करून येथे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या नियोजनाचा आढावा घेतला.