चिपळूण : यंदा अनियमीत पाऊस लागल्यामुळे एप्रिल-मे-जून महिन्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे तरी पडलेल्या पावसाचे पाणी कचे बंधारे बांधून पाणी अडवले पाहिजे नाले- दुरे -परे याचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवावे अन्यथा पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे तरी आपण सर्वांनी मिळून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कच्चे बंधारे बांधण्यास सुरुवात करूया असे विनम्र आवाहन पर्यावरण प्रेमी माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी केले आहे .