चिपळूण : चिपळूण शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त श्री क्षेत्र गांधारेश्वर येथे भाविकांसाठी खिचडी वाटपाचा भक्तीमय आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. श्रावण महिन्याच्या धार्मिक वातावरणात गांधारेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

श्रावण मास हा हिंदू धर्मपरंपरेत भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र महिन्यात श्री क्षेत्र गांधारेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादरूपी खिचडीचे वाटप करून शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धार्मिक भावनेसोबतच सामाजिक बांधिलकी जपली. भाविकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रसादाचा लाभ घेतला.

या उपक्रमाचे सौजन्य शहर सचिव प्रशांत मुळये तसेच त्यांचे मित्र व व्यावसायिक भार्गव देवळेकर आणि दिनेश रेडीज यांनी केले. सामाजिक उपक्रम सातत्याने प्रभावीपणे राबविण्यासाठी शहर सचिव प्रशांत मुळये यांचे विशेष सहकार्य लाभत असून, त्यांच्या पुढाकारातून पक्षाच्या सामाजिक बांधिलकीला अधिक व्यापक स्वरूप मिळत आहे.

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळये, युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, महिला शहर संघटक सौ. वैशाली शिंदे, युवतीसेना तालुका अधिकारी तीर्था लाड, विभागप्रमुख व नगरसेवक संजय गोताड, उपशहरप्रमुख राजू विखारे, विभागप्रमुख बापू चिपळूणकर, संकेत शिंदे, दीपक ओकटे, बंधू कदम, संतोष मिरगल, प्रमोद गांगण, उपविभागप्रमुख दीपक कदम, विकास गांगण, महेश संसारे, नवीनचंद्र किल्लेकर, शाखाप्रमुख सतीश शिंदे, दत्ता निवाते, विशाल पवार, राहुल लोटेकर, युवतीसेना शहर विभाग अधिकारी श्रुती खोपकर, दामिनी दळी, प्रियांका चोरगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धार्मिक स्थळी भाविकांची सेवा करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून श्रद्धा, संस्कार आणि माणुसकी जपण्याचे माध्यम आहे. ‘सेवा हीच भक्ती’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने श्रावण मासाच्या पवित्र वातावरणात सामाजिक ऐक्याचा आणि सेवाभावाचा संदेश दिला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सामूहिक सहभागामुळे हा उपक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.