मुंबई : सृष्टी ज्ञान संस्था मुंबई यांच्या वतीने रानभाज्या पाककला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पारंपरिक, पौष्टिक आणि आरोग्यदायी रानभाज्यांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, तसेच आपल्या खाद्यसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा वारसा जपत रानभाज्यांचे महत्त्व व पौष्टिक आहार यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.भविष्यातही अशाच उत्साहाने विविध उपक्रमात सहभागी व्हा,हीच सदिच्छा. आणि आमच्या याउपक्रमाला सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
सृष्टीज्ञान संस्थेच्या संगीता खरात
जिजाऊ ब्रिगेड आंतराराष्ट्रीय अध्यक्ष अनुजाताई भोसले , नगरसेविका अंजली ताई कदम , लायन्स झेड़ सी शमिना परकार , वीणाताई भोसले, रविना गुजर , नेत्रा पाटिल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . स्पर्धेचे परीक्षण नगरसेविका अंजली कदम तसेच लायन्स झेड सी शमीना परकार यांनी केले .
