चिपळूण : शहरातील रुग्णांना दर्जेदार व सातत्यपूर्ण स्त्रीरोग व प्रसूती सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अपरान्त हॉस्पिटल, चिपळूण येथे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूजा ओंकार भुरण (B.A.M.S., D.G.O.) पूर्णवेळ सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यांच्या रुजू होण्यामुळे परिसरातील महिलांना गर्भधारणा, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व उपचार आणि विविध स्त्रीरोगांवरील तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

डॉ. भुरण या अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ असून रुग्णांशी सौहार्दपूर्ण संवाद, अचूक निदान आणि परिणामकारक उपचार यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या सेवेमुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. विशेषतः गर्भारपणातील नियमित तपासणी, जोखीम असलेल्या गर्भधारणांची निगा, तसेच प्रसूतीनंतर आई व बाळाच्या आरोग्याची काळजी यावर त्यांचा विशेष भर असणार आहे.

अपरान्त हॉस्पिटलने मुंबई, पुणे, मिरज यांसारख्या मोठ्या शहरांत मिळणाऱ्या आरोग्य सुविधा व तज्ञ डॉक्टर चिपळूण येथे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने के. ई. एम. प्रशिक्षित ज्येष्ठ सर्जन डॉ. सदगुरु पाटणकर, ज्येष्ठ हृदयविकार व मधुमेह तज्ज्ञ डॉ. अतुल बोरोडे, फिजिशियन डॉ. ओंकार खोत, मिरज प्रशिक्षित अनुभवी महिला सर्जन डॉ. भक्ती पालांडे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे येथे प्रशिक्षित ऑर्थोपेडिक कन्सल्टंट डॉ. श्रीश भास्करवार, सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालय, मुंबई येथे प्रशिक्षित श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सौरभ सुर्वे, तज्ञ रेडिओलॉजिस्ट व सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सचिन विधाते, पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुरज शिकलगार अशा तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू तत्पर सेवेसाठी नेहमीच उपलब्ध ठेवला आहे.

याचबरोबर आपत्कालीन सेवा २४x७ उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांनी अपॉइंटमेंटसाठी 7998898989 / 7998737373 किंवा (02355) 254254 या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच सावित्री एन्क्लेव्ह, एल.आय.सी. ऑफिससमोर, भोगाळे, चिपळूण येथे भेट द्यावी, असे आवाहन अपरान्त हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. अपरान्तमध्ये तज्ञ डॉक्टरांद्वारे दिल्या जाणाऱ्या रुग्णसेवेच्या उज्ज्वल परंपरेमध्ये डॉ. पूजा भुरण यांची स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून पूर्णवेळ नियुक्तीमुळे एक मोलाची भर पडणार आहे. “आरोग्याच्या सर्व सेवा – एकाच छताखाली” या ध्येयवाक्याला अनुसरून अपरान्त हॉस्पिटलतर्फे ही महत्त्वाची पायरी उचलण्यात आली आहे.