चिपळूण : मा. मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान मा. आमदार श्री. शेखर अनुराधा गोविंदराव निकम, (265 चिपळूण विधानसभा मतदारसंघ) यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक 28/07/2026 रोजी चिपळूण तालुक्यात राधाताई लाड सभागृह, चिपळूण येथे आयोजित करणेत आले होते.

सदर शिबिरास मा. श्री. सुर्यकांत नारायण खेतले, सभापती पंचायत समिती चिपळूण, मा. श्रीम. शर्वरी प्रथमेश वेल्ये, सभापती पंचायत समिती संगमेश्वर , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य चिपळूण / संगमेश्वर तसेच मा. श्री. उमेश धोंडीराम सकपाळ, नगराध्यक्ष नगर परिषद चिपळूण व नगर सेवक नगर परिषद चिपळूण, मा. श्री. आकाश लिगाडे, उपविभागीय अधिकारी चिपळूण, तहसिलदार चिपळूण, तहसिलदार संगमेश्वर व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख, पत्रकार तसेच लाभार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

सदर शिबीरामध्ये पुढीलप्रमाणे सेवा देण्यात आलेल्या आहेत.

  1. वन विभाग व सामाजिक वनीकरण चिपळूण यांचेमार्फत रोपे वाटप
  2. कामगार विभागामार्फत कामगार ओळखपत्र वाटप
  3. महिला व बाल विकास विभाग मार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, मातृ वंदन योजना, बेबी केअर किट, बाल संगोपन योजना
  4. तहसिलदार कार्यालयामार्फत संजय गांधी योजना, श्रावणबाळ, पुरवठा विभाग शिधापत्रिकेवरील कमी नाव करणे, नाव वाढविणे, नवीन अंत्योदय शिधापत्रिका वाटप, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, विविध प्रकारचे दाखले तसेच 7/12, आठ-अ, फेरफार
  5. भूमि अभिलेख विभागामार्फत गटनकाशा, मालमत्ता कार्ड, सनद वाटप
  6. नगर परिषद चिपळूण मार्फत जन्म व मृत्यु दाखले, बचत गट बँक लिंकेज योजना, पी.स्व.निधी योजना, असेंसमेंट उतारा
  7. आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, वय वंदन कार्ड, आरोग्य तपासणी
  8. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दुधाळ जनावरे वाटप
  9. कृषि विभागामार्फत पीएम किसान लाभार्थी
  10. जिल्हा उद्योग केंद्र यांचेमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती मंजूर पत्र
  11. पंचायत समिती मार्फत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थी यांना चाव्यांचे वाटप करण्यात आले. जन्म व मृत्यु दाखले वाटप करण्यात आले.