रसायनी : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वासांबे विभाग प्रमुख मंगेश पाटील यांच्यावतीने वासांबे रसायनी परिसरातील राजिप शाळांतील पंधरा राजिप शाळांतील जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यात मोहोपाडा राजिप शाळा 255,रिस 106,कांबे 35, तळेगाव -40,लोधिवली -32,रिसवाडी -33,चांभार्ली-50,आंबिवली-30, शिवनगर -35,पानशिल -18, तळेगाव वाडी -18,वरोसे-70,वरोसेवाडी-17,नढाळ ठाकूरवाडी -24,नढाळ कातकरवाडी -35 अशा 15 शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी उध्दव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंड, महिला आघाडी प्रमुख सुवर्णा मुंडे,माजी सभापती रमेश पाटील,माजी सरपंच भाग्यश्री पवार,माजी सरपंच दिपिका तांडेल,माजी सरपंच रोशन राऊत,माजी सरपंच अर्जुन कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे,माजी उपसभापती गजानन मांडे,माजी उपसरपंच दत्ता खाने,माजी उपसरपंच अमित मांडे,ग्रामपंचायत सदस्या रसिका खराडे,सदस्या प्रतिक्षा राऊत, सदस्या वेदीका पाटील,शालेय मुख्याध्यापिका राखी खराडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा पाटील आदींचा उपस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांला लाॅग नोटबूक व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक,कार्यकर्ते उपस्थित होते.