मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत स्थानिक पातळीवरील प्रश्न, जनतेच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्यादृष्टीने विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि समस्या जाणून घेतल्या.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करावेत. तसेच, स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्यरत राहावे, अशा सूचना यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
