मुंबई : नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्च काढलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आश्रय घेतला होता. मात्र, मध्यरात्रीपासून पोलिसांनी विद्यार्थ्यांचा ससेमिरा सुरू केला. पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयात बेकायदा प्रवेश करून विद्यार्थिनींना धमकावले आणि त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी NSUIचे अध्यक्ष सागर साळुंखे तसेच मुंबई NSUIच्या अध्यक्षांना अटक केली आहे.

“काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांनी अशा बेकायदा पद्धतीने प्रवेश करून केलेली कारवाई ही दंडेलशाहीचे लक्षण आहे. अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची तसेच NSUIच्या पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करावी.

विद्यार्थ्यांची सुटका केली नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.