मुंबई : विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

“तुम्ही ‘वेड्याला वेद म्हणायला लावले’ या अहंकारात राहा. मी वारकऱ्याचा पोरगा आहे. अध्यात्माचे हे वेड मला आज लागलेले नाही, तर लहानपणापासूनच आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

विश्वास बसत नसेल, तर तीन ते चार वर्षांपूर्वीचा हा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून नीट ऐका आणि यातले काही रोहित पवारांना कळते का, ते विचारा, असे म्हणत नवनाथ बन यांनी विवेकानंद पाटील यांना प्रत्युत्तर दिले.