दापोली : डॉ. बाळसाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, दापोली येथे ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि त्याचे संभाव्य परिणाम या गंभीर विषयावर जनजागृती व मार्गदर्शनासाठी “जलसंवाद” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता कृषी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले होते .
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी निवेदिता प्रतिष्ठान, दापोलीचे अध्यक्ष आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
येणाऱ्या काळात वॉटर लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त करतानाच; सावध पुढल्या हाका या तत्त्वानुसार पाण्याच्या बचतीचे आणि येणाऱ्या संकटात ठामपणे उभे राहण्याचे अनेक उपाय आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयांतर्गत असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी आणि योग्य उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी हा “जलसंवाद” कार्यक्रम अत्यंत मोलाचा ठरला आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर
डॉ.रमेश कुणकेरकर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय दापोली, डॉ. पुष्पा पाटील मॅडम, विभाग प्रमुख , वनस्पती रोगशास्त्र विभाग व उपाध्यक्ष, विद्यार्थी परिषद, कृषी महाविद्यालय , दापोली.अपर्णा पित्रे, सहाय्यक नियंत्रक व सदस्य सचिव विद्यार्थी परिषद कृषी महाविद्यालय दापोली, निवेदिता प्रतिष्ठानच्या महेश्वरी विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
वॉटर लॉकडाऊन ची भीती… पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे डॉ. प्रशांत परांजपे यांचे आवाहन…
