चिपळूण : देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या विकासात्मक वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘नमो गाथा’ पथनाट्याचे शहरात सादरीकरण करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चिपळूण ग्रामीण मंडलाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विविध क्षेत्रांत झालेली विकासकामे, जनकल्याणकारी योजना, सामाजिक परिवर्तन तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यांची माहिती या पथनाट्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना व विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

दिपेश घाणेकर, आकांशा नरळकर, श्रिया कष्टे , शांभवी पोक्षे , जुईली पडवळ, गौरी डेरवणकर यांनी हे पथनाट्य सादर केले. भारतीय जनता पार्टी चिपळूण ग्रामीण मंडलचे तालुकाध्यक्ष विनोद भुवन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, पंचायत समिती सदस्या सुप्रिया देवरुखकर, ग्रामीण मंडल उपाध्यक्ष महेश शिंदे, तालुका सरचिटणीस दिपक शिंदे, उपतालुकाध्यक्ष संदीप सुखदरे, शहराध्यक्ष आशिष खातू, युवा मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश कदम, युवा मोर्चा महिला अध्यक्षा अदिती गुढेकर, कार्यक्रम संयोजक सुमित चिले, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.