सावर्डे : मुंबई विद्यापीठ आणि एन. के. वराडकर महाविद्यालय, दापोली यांच्या संयुक्त आयोजनाखाली झालेल्या झोन IV पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ मध्ये कला व विज्ञान महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत सावर्डे या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हिरवळ एज्युकेशन सोसायटी, महाड आणि एसएसपी कॉलेज, कणकवली या संघांवर विजय मिळवला. त्यानंतर उपांत्य फेरीत डी. बी. जे. कॉलेज, चिपळूणच्या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात सावर्डेच्या संघाची लढत सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजच्या संघाशी झाली. हा सामना अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा झाला. खेळाडूंनी शेवटपर्यंत जिद्द आणि सांघिक भावना कायम ठेवली; मात्र निर्णायक सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चिपळूण संगमेश्वर चे विद्यमान आमदार मा.शेखर निकम व कार्यकारी अध्यक्ष मा.अनिरुद्ध निकम,सचिव,मा महेश महाडिक,महाविद्यालयाचे प्राचार्य, तानाजी कांबळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. संकेत कुरणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे संघाला ही उल्लेखनीय कामगिरी करता आली.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
