जळगाव:- मागील दहा दिवसांत आज तब्बल चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मोदीजी देशवासीयांना ‘स्लो पॉईजन’ देत आहेत असे त्यांनी म्हटलंय रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या आहेत की, आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी. मागील १० दिवसांत ही चौथी वाढ आहे. आम्ही आधीच सांगितले होते की निवडणुकीचा संपूर्ण खर्च भाजप सरकार हळूहळू वसूल करणार आहे असे त्या म्हणाल्या हा चौथा हफ्ता असून मोदीजी देशवासीयांना ‘स्लो पॉईजन’ देत आहेत असंही त्या म्हणाल्या.