चिपळूण ः सृष्टीज्ञान संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी पाककृती स्पर्धेत रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, चिपळूणच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. आर्या करमरकर, सहर काझी आणि करिश्मा तानकर या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेऊन महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून पौष्टिक, पारंपरिक व नाविन्यपूर्ण पाककृती सादर करण्यात आल्या. यामध्य आर्या करमरकर हिने तयार केलेल्या ‌‘भारंगी पास्ता‌‘ या अभिनव पाककृतीने तृतीय क्रमांक पटकावला. तर सहर काझी आणि करिश्मा तानकर यांनीदेखील उत्कृष्ट पाककृती सादर केली.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. रिगल कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत असून, या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि कौशल्याधारित वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.