चिपळूण : चिपळूण श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या तेविसावी शाखा पाग चिपळूणचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर जी आरेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संस्थेचे सभासद श्री प्रकाश आंबुर्ले , श्री सोपान पाटील, सौ वैष्णवी मुननकर , श्री नंदकुमार तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्यपद्धतीचे व तत्पर सेवेचे कौतुक करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रभाकरजी आरेकर व संचालक मंडळ तसेच कर्मचारी यांचे विशेष आभार मानले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकरजी आरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आर्थिक स्थितीचे सविस्तर विवेचन करून संस्थेची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी बोलताना संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले असून त्यानिमित्ताने संस्थेच्या पंचवीस शाखा या वर्षामध्ये सुरू करण्याचा मानस असून त्या दृष्टीने सर्व प्रकारची अंमलबजावणी करण्यात येत आहे. संस्थेच्या या यशामध्ये चिपळूण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व आजी-माजी अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले असून संस्थेने केलेल्या प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच हितचिंतक यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. कोणत्याही संस्थेचे मूल्यमापन करून सभासद, ठेवीदार, ग्राहक यांनी दिलेली पोचपावती कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले व सर्व उपस्थितांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्याचे निमित्ताने गुहागरचे आमदार माननीय भास्कररावजी जाधव सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अनिरुद्धजी निकम आणि वशिष्ठी मिल्क अँड मिल्कप्रोडक्ट चे मा. प्रशांतजी यादव, चिपळूण पंचायत समितीचे सभापती माननीय सूर्यकांतजी खेतले , चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष माननीय मोहनरावजी मिरगल व त्यांचे सहकारी, मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे श्री.दत्तारामजी सुर्वे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी-माजी अधिकारी, चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक श्री. मिथिलेश नरळकर , उपमुख्याधिकारी श्री. ठसाळे , पाग परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून यावेळी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री हेमचंद्र हळदणकर , संचालक सर्व श्री. दिलीप मयेकर, श्री सुहास भोसले, श्री. पराग आरेकर, श्री अरुण पाटील, श्री उदय वेल्हाळे , श्री विजय जाधव, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीमती प्रज्ञा नरवणकर, सौ रागिणी आरेकर तसेच संस्थेचे कर्मचारी वर्ग व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक श्री संदीप रहाटे यांनी मानले.