खेड :- तालुक्यात कडक उन्हाळ्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार लागल्याच्या पार्श्वभूमीवर १) घेरारसाळगड गावातील भराडे, धनगर वाडी, तांबटवाडी, बौद्धवाडी, पेठवाडी, २) निमणी – धनगरवाडी या टंचाईग्रस्त वाड्यांना पिण्याची टंचाई जाणवत आहे. म्हणून टॅन्करने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी करणारे अर्ज प्रशासनालाच सादर केलेले असतानाच आणखी ३) कासई बोरवाडी, ४)खवटी खालची व वरची धनगरवाडी ५) हुंबरी म्हाळुंगे धनगरवाडी या दोन गावांमधील ग्रामस्थांनी टॅन्करने पाणी पुरवठा करावा. अशी मागणी पाणीटंचाईग्रस्त गाव/वाड्यांमधील ग्रामस्थांकडून होत आहे. आता प्रशासन कधीपासून पाणीटंचाईग्रस्त गावे वा वाड्यांना टॅन्करद्वारे पाणीपुरवठा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्याचे आमदार तथा गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी यामध्ये विशेष लक्ष देवुन टंचाईग्रस्त गावे वाड्यांना टॅन्करने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाला आदेश द्यावेत. अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- सुलभा मोहिते यांजतर्फे, मिरजोळी शाळेतील विद्यार्थांना स्कुल बॅगचे वाटप…
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यभर धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
- स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘पेशंट असिस्टंट’ कोर्स सुरू…
- ऑपरेशन टेप फॉर सेफ अभियानांतर्गत अवजड वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मोहीम सुरू….
- अलिबाग–पनवेल शिवशाही बसचा भीषण अपघात; 40 प्रवासी थोडक्यात बचावले….