चिपळूण : चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा धामणवणे नं. १ या शाळेचा विद्यार्थी कुमार श्री पवन शिगवण याने शासनाच्या इ. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या इतिहासात पहिला शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी होण्याचा मान मिळवला आहे. गेली अनेक वर्षे यशाच्या जवळपास पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारे शिक्षक दीपक भागडे यांचेही शिक्षवृत्ती धारक विद्यार्थ्यासह अभिनंदन होत आहे. शाळेच्या या सुयशाबद्दल माजी शिक्षण विस्तार अधिकारी साधना कदम, शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रदीप पवार व पदवीधर शिक्षक सुरेश तांबे यांनी श्री शिगवण व मार्गदर्शक शिक्षक दीपक भागडे व मुख्याध्यापक शिवाजी कोदारे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ग्रामस्थांसह शैक्षणिक क्षेत्रातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत श्री पवन शिगवणची बाजी; शाळेचा गौरव…
