मुंबई – समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दिनांक १० जून रोजी दुपारी २ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दादांनी पक्ष विस्तारासाठी… पक्षाचा जनाधार चांद्यापासून बांद्यापर्यंत होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिला. ७३ जागा विधानसभेवर निवडून आल्या. २०२३ मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचे बहुजन समाजाचे व्यापक हित साधायचे असेल तर सत्तेत असले पाहिजे हे विचार घेऊन सत्तेत सहभागी (एनडीएमध्ये सहभागी) होण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी सामुदायिकरित्या घेतला. त्यामध्ये मी, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आणि विधीमंडळाचे बहुतांश सदस्य एनडीएमध्ये सहभागी झाले असेही सुनिल तटकरे म्हणाले.