दापोली – दापोली येथील डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल ८७.१५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.२४ टक्के तर कला शाखेचा निकाल ८१.८१ टक्के लागल्याची माहिती देण्यात आली.
महाविद्यालयात कु. नुपूर संदीप नवरत हिने ८७.५० टक्के गुण मिळवून कला शाखेत तसेच तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. याशिवाय वाणिज्य शाखेत कु. पूर्वा महेश रामणे हिने ६९.०० टक्के तर विज्ञान शाखेत श्रेयस कौस्तुभ रानडे याने ७०.१७ टक्के गुण मिळवून आपल्या शाखेत प्रथम क्रमांक मिळवला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक श्री. संदीप राजपूरे, अध्यक्षा सौ. स्मिताली राजपूरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निकुंब, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर तसेच सर्व संचालकांनी विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य वेदिका राणे, प्रा. संतोष येळवरे, प्रा. रेश्मा तांबे, प्रा. स्मिता बेकर, प्रा. विद्याधर बेंडखळे, प्रा. क्षितिजा गोडबोले, प्रा. विभावरी गमरे, प्रा. निलेश तेरेदेसाई, प्रा. रुपेश तांबे, प्रा. समीर लवटे, प्रा. प्रीती सकपाळ आणि प्रा. अंकिता नळे यांचे मार्गदर्शन लाभले.