चिपळूण : सिंधुरत्न समृद्ध योजना 2 . O अंतर्गत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनयजी नातू साहेब यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू केला. सुरूवातीला चिपळूण तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या निकषानुसार प्रस्ताव सादर करा असे आवाहन पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले. तसेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी, मंडल अध्यक्षांनी तालुक्यातील प्रत्येक बूथ वरती जाऊन संघटन वाढीसाठी प्रयत्न करा, मन की बात कार्यक्रम, SIR, सहकार क्षेत्र या संदर्भात सुध्दा नातू साहेबांनी आढावा घेतला.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या सिंधुरत्न समृद्ध योजना 2 . O ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीच खऱ्या अर्थाने डॉ विनयजी नातू साहेब यांची रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड झाली आहे असे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, अजित साळवी, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भूरण, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग, चिपळूण उप नगराध्यक्षा सौ. रूपाली दांडेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. दिप्ती महाडिक, सर्व नगरसेवक , नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी सर्वांचे आभार मानले