आंबडस : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्यार्थ्यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक उत्पादन, कृषी माहिती केंद्र,सेंद्रिय शेती, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जलसंधारण, मृदासंवर्धन, कृषी प्रक्रिया तसेच विविध शासकीय कृषी योजनांची माहिती देण्यात आली.

तसेच या प्रदर्शनात कृषीदुतानीं विविध कृषी माहिती फलक, कृषी तंत्रज्ञान प्रतिकृतीकरण, चार्ट व प्रात्यक्षिके तयार करून शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पिकांमध्ये संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पीक संरक्षण, सुधारित बियाणे, जैविक निविष्ठांचा वापर आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याबाबत माहिती देण्यात आली. व सहभागी ग्रामीण मुल्यांकन (PRA) तयार केले

प्रदर्शनाला गावातील शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करून शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुनीतकुमार पाटील सर, RAWE मार्गदर्शक प्राध्यापक श्री निशिकांत पाकळे व श्री प्रशांत पवार सर तसेच न्यू इंग्लिश स्कूल आंबडस विद्यालयाचे प्राचार्य श्री वसंत यादव सर व सहकारी शिक्षक कर्मचारी, अधिकारी, विषय तज्ज्ञ, , ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीदूत रणजीत हिरवे, अथर्व जगदाळे, समर्थ भोसले, सोहम मडके, रोहन जगदाळे व अनिरुद्ध कोळेकर या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.