दापोली : भंडारी हितवर्धक ग्रामीण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दापोली येथील पेन्शनर्स असोसिएशन सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
खालील या सभेसाठीच्या व्यासपीठावर पतसंस्थेचे उपाध्यक्ष अमोल नरवणकर, उपाध्यक्ष नितीन मयेकर, संचालक प्रेमानंद महाकाळ, शशिकांत वऱ्हाडकर , अभय गोयथळे, राजेश सुर्वे, जितेंद्र जाधव, केतन वणकर, सुवर्णा मयेकर, ज्योती नागवेकर, तज्ञ…
संचालक कृष्णकुमार बुटाला, पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक पराग भाटकर, लेखापाल स्वाती बोरकर, वरिष्ठ लिपिक अपर्णा महाकाळ दिपक मोरे आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली. सुरुवातीस अहवाल वर्षात दिवंगत तथा दुःखद निधन, अपघाती निधन झालेल्या सर्व थोर व्यक्ती, कलाकार, अभिनेत्य, साहित्यिक, पतसंस्थेचे सभासद तसेच ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
सभेच्या प्रारंभी अध्यक्ष सचिन तोडणकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर व्यवस्थापक पराग भाटकर यांनी मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. उपस्थित सर्व सदस्यांनी या इतिवृत्तास मंजुरी दिली. सभेत सन २०२५-२६ अखेरचा अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंदाचे वाचन करण्यात आले. त्यावर सविस्तर चर्चा करून त्यास मंजुरी देण्यात आली.
याशिवाय सर्वसाधारण सभेत नफा विभागणीस मंजुरी, लेखापरीक्षक नेमणूक, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक, तसेच सभासदांकडून आलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. संस्थेच्या पारदर्शक कारभाराबाबत उपस्थित सर्व सभासदांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.
दापोली तालुक्यातील आंजले येथे पतसंस्थेची नवीन शाखा सुरू केल्याबद्दल तसेच तेथील कारभार देखील समाधानकारक असलेबद्दल सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेचे सभासद तसेच त्यांचे पाल्य यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश व पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अशा सर्वांचा पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात….
