मंडणगड : तालुक्यातील घराडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतजमिनीतील गुरांच्या गोठ्याजवळ विनापरवाना देशी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या व्यक्तीवर मंडणगड पोलिसांनी कारवाई केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत गणपत कंके (वय ७०, रा. घराडी गावठाण, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजता घराडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतजमिनीतील गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला विनापरवाना देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १००/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनय रमेश पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली.
या कारवाईत पोलिसांनी ७ हजार ४४० रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण ९३ बाटल्या जप्त केल्या आहेत. पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.
घराडी येथे ९३ देशी दारूच्या बाटल्या जप्त; वृद्धावर गुन्हा दाखल….
