रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित मनसे तालुका अध्यक्ष दत्ता दिवाळे म्हणाले की, राजापूर तालुक्यातील काही मनसे पदाधिकारी आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. तरी देखील तालुक्यात आपला पक्ष संपलेला नाही. गावागावात आपले कार्यकर्ते असून आम्ही त्यांना बळ देणार आहोत. आता विभाग निहाय मनसे कार्यालय स्थापन करणार आहोत. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका होणार असून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तळागाळात वाढवणाऱ्या चांगल्या क्रियाशील कार्यकर्त्यांनाच पदे दिली जाणार असल्याची माहिती श्री दिवाळे यांनी दिली. या बैठकीवेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदाळकर, उपजिल्हाध्यक्ष राजेश पवार, उप तालुकाध्यक्ष राजेश कणेरी, उप विभाग अध्यक्ष संतोष मिरगुले, स्वप्नेश पाटील या पदाधिकाऱ्यांसह ओंकार पाटील, विलास बाणे, महेश मटकर, अमीर जड्यार, प्रणय लिगम, अनिल मांजरेकर, ज्ञानेश्वर गोंडाळ, दिलदार प्रभुलकर, विनायक जोशी, सम्राट पाटील, अरुण पारकर, योगेश कणेरी, मंगेश नारकर, सचिन भोवड, मानव माटल, साहिल पाटणकर, राजाराम गोरे, रमेश मापेलकर, नितीन पाटणकर, गुलजार मस्तान आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसे राजापूर तालुका कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात संपन्न…
