मतदानाचा हक्क बजावून नवरी थेट लग्न मंडपात!
लोकशाहीला प्रथम प्राधान्य देत रेश्मा नरळकरने घालून दिला आदर्श
खेड : चंद्रकांत बनकर
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत असताना खेड तालुक्यातील जामगे गावात लोकशाहीचा एक प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. लग्नाच्या बोहल्यावर उभे राहण्याआधीच तरुणीने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती असलेली जाणीव अधोरेखित केली.
जामगे येथील रेश्मा नरळकर या नववधूने आज आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसालाही लोकशाहीच्या कर्तव्यापेक्षा मोठे मानले नाही. सकाळी विवाहसोहळ्याची तयारी सुरू असतानाच रेश्माने मतदान केंद्र गाठले आणि जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले मत नोंदवले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच ती लग्न मंडपात उभी राहण्यासाठी रवाना झाली.
“लग्न आयुष्यात एकदाच येते, पण लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे,” असा संदेश रेश्माच्या या कृतीतून मिळतो. नवरीच्या या निर्णयाचे उपस्थित नागरिकांनी, मतदान कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनीही कौतुक केले.
आज अनेक ठिकाणी मतदानाबाबत उदासीनता दिसून येत असताना रेश्मा नरळकरने दिलेला हा आदर्श विशेष उल्लेखनीय ठरत आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा लोकशाहीच्या हक्काला प्राधान्य देणारी ही घटना समाजासाठी प्रेरणादायी असून, विशेषतः तरुण मतदारांसाठी एक सकारात्मक संदेश देणारी आहे.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे किती महत्त्वाचे आहे, हे रेश्मा नरळकरच्या या कृतीतून अधोरेखित झाले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
