चिपळूण : माजी सभापती श्री. विजयराव गुजर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

दरम्यान, आज आमदार शेखर निकम यांनी श्री. विजयराव गुजर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन आणि त्यासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर काम करण्याची संधी गुजर यांना मिळणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजयराव कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या नियुक्तीमुळे विजयराव गुजर यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.