गुहागर : गुहागर शहरातील खालचापाट येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास श्री. सचिन बामणे यांच्या रहात्या घराला आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे १.४९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
घराला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर CISF, कोकण LNG यांच्या अग्निशामक दलाच्या जवानांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, नगराध्यक्ष नीता मालप यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे घराचे किती नुकसान झाले आहे, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
