चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभाग निरीक्षक वारीस खान साहेब यांचा कोकण विभाग दौरा दिनांक ८/९/२०२६ रोजी सावरकर हॉल चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता.
संघटनात्मक बांधणी, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्षविस्तारावर सविस्तर चर्चा
जिल्हा अध्यक्ष सुरेश बने साहेब म्हणाले की कार्यकर्त्यांना जेवढी ताकद लागत आहे तेवढी ताकद मी देत आहे आणि यापुढेही त्यांना संपूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीनिशी उभा राहणार पक्षाने फक्त ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच समाधान करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा बाकी आम्ही पवार साहेबांना मानणारी लोक आहोत पवार साहेबांचे विचार तळागाळात पोचवण्याचे प्रामाणिक काम आमचे चालू होते आहे आणि यापुढेही राहणार
पक्षाने दिलेल्या संधींची जाणीव, पक्षाशी निष्ठा कायम
यावेळी बोलताना शिरीष काटकर यांनी पक्षासोबतच्या आपल्या दीर्घकाळच्या संबंधांचा उल्लेख करत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाने अनेक कार्यकर्त्यांना विविध पदे व राजकीय संधी देत त्यांना सक्षम केले. अनेकांना नगरसेवक, आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पक्षामुळे मिळाली.
आज पक्षासमोर काही आव्हाने असली तरी पक्षाची साथ सोडण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा एकदा त्याच ताकदीने पक्षाला उभारी देण्यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तळागाळात प्रामाणिकपणे काम; पक्षाकडून अधिक ताकदीची अपेक्षा
अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि तळागाळात उतरून सुरू असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, “आम्ही ग्राउंड लेव्हलवर जाऊन पक्षाचे काम करत आहोत. मात्र, हे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी पक्षाकडूनही आम्हाला संघटनात्मक ताकद आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत थेट संवाद साधता यावा, त्यांच्या कामाची दखल घेतली जावी आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची पक्षाने योग्य ती दखल व दाद घ्यावी.”
तसेच मा. सुप्रिया सुळे ताई यांच्याकडून वेळ घेऊन जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर मा. वारिस खान साहेब यांनी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून काम
महिला तालुका अध्यक्षा अस्मिता अडविलकर यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी तळागाळात काम सुरू असून, सुप्रिया सुळे ताई यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यास या उपक्रमाला आणखी मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रलंबित मृत्यू दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधताना मृत्यू दाखले मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत मा. वारिस खान साहेब यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
गावागावात जाऊन पक्षविस्ताराचा निर्धार
OBC जिल्हाध्यक्ष वासू आप्पा मिस्त्री यांनी आपण सुरुवातीपासूनच शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांसोबत असल्याचे सांगत भविष्यातही पक्षासोबत ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
काही कारणांमुळे मागील काळात पक्षासाठी अपेक्षित वेळ देता आला नाही, मात्र यापुढे गावागावात जाऊन नागरिक व कार्यकर्त्यांशी संपर्क साधत पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महिला जिल्हा अध्यक्ष दीपिकाताई कोतवडे कर म्हणाल्या की महिलांच्या हाताला जास्त जास्त काम कसं मिळेल यावर पक्षाने भर दिला पाहिजे आम्ही तळा गळ्यात जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेत आहोत त्यांच्या हाताला काम आणि त्यांना अधिक सक्षम करण्यावर चर्चा ही आम्ही करत आहोत ह्या सर्व महिलांना घेऊन सुप्रियाताई यांची भेट घेऊन देणे गरजेचे आहे आणि वारीस खान साहेब यांनी त्याची दखल घ्यावी असं त्या म्हणाल्या
सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विचारांची भूमिका
यावेळी शौकत कादरी यांनी आपल्या मनोगतात भारतातील सामाजिक सलोखा आणि एकोप्याबाबत आपले मत व्यक्त केले. “अल्पसंख्यांक असल्याची भावना मला कधीच परकी वाटली नाही. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव माझ्या अनुभवात जाणवला नाही. पक्षाने आम्हाला राजकीय व्यासपीठ आणि काम करण्याची ताकद दिली आहे; आता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपली भूमिका बजावण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
संघटनात्मक मजबुतीवर भर
या संपूर्ण दौऱ्यात पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा, तळागाळातील संघटन मजबूत करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि गावागावात पक्षाचा जनसंपर्क वाढवणे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षासमोर आव्हाने असली तरी निष्ठावान कार्यकर्त्यांची एकजूट, तळागाळातील सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाची संघटना पुन्हा अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
