आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्पुटर सेंटर आबलोली यांच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून माध्यमिक विद्यालय आबलोली तसेच एक्सलंड अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली येथील शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक डिजिटल “स्किल्स, अल टूल्स, डिजिटल इमपावर्मेंट फॉर टीचर्स”या कोर्स विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुयश कॉम्पुटर सेंटर आबलोली यांच्या वतीने संचालक संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी यांच्या वतीने ज्ञान देणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना सन्मान पूर्वक सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी सावंत, सलोनी मोहिते, सिद्धी डिंगणकर, साक्षी आंबेरकर, शुभम सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.
सुयश कॉम्पुटर आबलोली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा..
